लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ उपेक्षितच,अध्यक्षांच्या प्रतीक्षेत मातंग समाज

शेवगाव:  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अध्यक्षांची नियुक्ती करा अशी मागणी आण्णाभाऊ यांचे नातू सचिन साठे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव ठिकाणी आले असता त्यांनी केली. भाजपला चार वर्षांपासून सत्तेवर येऊन झाली मात्र अध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही त्यामुळे येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत याचे उत्तर भाजप सरकारला दिले जाईल असा घणाघात साठे यांनी केला.

अहमदनगर जिल्ह्यातील कोकणगाव याठिकाणी झालेल्या मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनसाठे हे शेवगाव येथे आले असता त्यांनी पुढील मागणी केली.

भाजपा सरकार गेल्या चार वर्षांपासून सत्तेवर आहे व सत्तेवर आल्यापासून त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळावर आणखीही कोणाचीही निवड केली नाही याचा निषेध करत सचिन साठे यांनी भाजप सरकार मातंग समाजावर अन्याय करत आहे व याचा येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत याचे उत्तर भाजप सरकारला दिले जाईल असे अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी सांगितले. महामंडळावर निवड न करणे म्हणजे दलित समाजावर एक मोठा प्रकारचा अन्याय आहे व जे राष्ट्रसंतांच्या नावाने चाललेले जाणारे जि महामंडळे आहेत ती मोडीत काढण्याचा घाट भाजप सरकारने चालवला आहे असे ही सचिन साठे यांनी म्हटले आहे .

दरम्यान, याच विषयावर आम्ही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, महामंडळात जो घोटाळा झाला होता त्याची चौकशी सुरु असल्याने अध्यक्षांची नेमणूक करण्यात आलेली नाही असं त्यांनी सांगितलं तसेच कुणाचीही कामे अध्यक्ष नसल्याने अडून राहत नसल्याचा दावा केला आहे.