लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा २७ करावी ; नीती आयोग

दिल्ली: अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरज आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा ३२वरून २७ करावी अशी शिफारस नीती आयोगाने केंद्र सरकारकडे  केली आहे.  लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बदल करण्याची आणि नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि निवड परिक्षेत काही आमुलाग्र बदल करण्याची गरज नीती आयोगाने व्यक्त केली आहे.

नवीन अधिकाऱ्यांची विविध विभागांमध्ये नियुक्ती त्यांच्या वयानुसार करावी असं नीती आयोगाचं मत आहे.  अधिकारी तरूण आणि तडफदार असायला हवे.  २०२० नंतर भारतात ६५ % जनतेचे वय ३५हून कमी असेल.  युपीएससीची परीक्षा पास करण्याचे सरासरी वय साडेपंचवीस आहे. सध्या युपीएससीसाठी वयोमर्यादा ३२ वर्षं आहे.

तेव्हा वयोमर्यादा आणि जागा कमी कराव्यात आणि विविध विभागांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती लॅटरल एन्ट्री स्कीममधून करण्यात यावी तसंच ठराविक विषयात प्राविण्य मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांनाच तिथे जागा द्यावी असंही नीती आयोगां म्हणणं आहे.  याप्रमाणेच परीक्षा प्रक्रियेतही काही बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.