भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निकाल २०१९ आज जाहीर होत आहेत. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत येणार की काँग्रेसप्रणित यूपीए सरकार सत्तापालट करणार की तिसरी आघाडी आपला दम दाखवणार हे आज समजणार आहे. देशभरात ७ टप्प्यात लोकसभेच्या ५४२ जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं. या मतदानानंतर आता कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होत आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.राज्यात १२, १९, २३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते. यामध्ये नितीन गडकरी, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य मत यंत्रात बंद झाले होते.

– भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर

– आतापर्यंत सुजय विखे यांना २९,६०० मतं तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना १७,३४८ मतं

– राज्यात अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे आघाडीवर

Loading...

– महाराष्ट्रातील बारामतीत सुप्रिया सुळे 6000 मतांनी आघाडीवर

– मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागांवर शिवसेना-भाजप उमेदवार आघाडीवर

Loading...

– अमेठीत राहुल गांधी पिछाडीवर

Loading...

– महाराष्ट्रातील कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडीवर

– भाजप ११० जागांवर तर काँग्रेस ५५ जागांवर आघाडीवर

– वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी आघाडीवर