‘लाव रे तो व्हीडोयो’चा आतापर्यंतच्या निकालात झिरो इफेक्ट

blank

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीत महायुती विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरेंचा लोकसभा निवडणूकीच्या आतापर्यंतच्या निकालात झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडणूक लढला नाही. मात्र तरीही राज ठाकरे यांनी महायुतीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सभा घेतल्या. इतकेच नव्हे तर, लाव रे तो व्हीडोयो म्हणत त्यांनी भाजपची पोलखोल केली. राज ठाकरे यांच्या सभेचा कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला फायदा होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणूकीच्या आतापर्यंतच्या निकालात झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे, कालच कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेचा काय निकाल लागेल त्यावर विधानसभेत राज ठाकरे यांन उटीत घेण्याचा विचार करू, परंतु आतापर्यंत जो निकाल लागला आहे त्यामध्ये राज ठाकरे यांचा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. तसेच कॉंग्रेस राज्यात एकही जागेवर आघाडीवर नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभांचा फायदा महायुतीला झाला असल्याचे दिसत आहे.

याचबरोबर, राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा आघाडीला नाही तर युतीला झाला असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हंटले.