Breaking News : मराठवाड्यात ८ पैकी ७ जागांवर युती आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार देशभरात भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर आहेत, तर राज्यात देखील भाजप- सेना युती आघाडीवर आहे. मराठवाड्यामध्ये ८ पैकी ७ जागांवर युती आघाडीवर आहे. तर औरंगाबादमध्ये वंचित आघाडीचे इम्तियाज आली हे आघडीवर आहेत.

या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला राज्यातून २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे यश मिळणार नाही असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र येत असलेल्या निकालांनुसार विरोधक तोंडघशी पडताना दिसत आहेत. कारण मराठवाड्यात देखील भाजप युतीने ८ पैकी ७ आघडी घेतली आहे.

Live Updates महाराष्ट्र -: भाजप : २२ , शिवसेना : १९, राष्ट्रवादी : ५ कॉंग्रेस : १ , वंचित : १