Breaking News : मतमोजणीला सुरवात होताच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

बारामती मतदारसंघाच्या निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. मतमोजणीला सुरवात होताच बारामती लोकसभा मतदारसंघाचा कल आला आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे १८०० मतांनी आघाडीवर आहेत. बारामती या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून कांचन कुल यांना उतरवण्यात आले होते.

सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस २०१४ मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार ? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

११ एप्रिल ते १९ मे दरम्यान लोकसभेच्या ५४२ जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात ९०.९९ कोटी मतदारांपैकी जवळपास ६७.११ टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.