fbpx

रामटेकचा सेनेचा गड अभेद्य, कृपाल तुमाणे ७५ हजार मतांनी विजयी

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे अनेक ठिकाणी विजयी ठरले आहेत. तसेच राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा लाजीरवाणा पराभव होताना दिसत आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे यांनी विजय मिळवला आहे. जवळजवळ ७५ हजारांच्या मताधिक्यानी कृपाल तुमाणे यांनी विजय मिळवला आहे.

रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांना शह देण्यासाठी कॉंग्रेसकडून किशोर गजभिये हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अखेर रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने कृपाल तुमाणे यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार कृपाल तुमाणे यांना ४२५१५५ एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार किशोर गजभिये यांना ३४८२८३ एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत कृपाल तुमाणे यांनी ७६८७२ मतांनी बाजी मारली आहे.