fbpx

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पराभवाच्या छायेत, ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित

टीम महाराष्ट्र देशा :  गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. सध्या ओमराजे 85 हजारांच्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.

 उस्मानाबाद मतदार संघातून आघडीकडून राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या   विरोधात युतीकडून ओमराजे निंबाळकर यांना उतरवण्यात आले होते. अखेर जनतेने ओमराजे निंबाळकर  यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिल्याच दिसत आहे.

उस्मानाबादच्या  या  प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार ओमराजे निंबाळकर  यांना 445978 एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना 360748 एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत ओमराजे निंबाळकर  यांनी 85230 मतांनी बाजी मारली आहे, असे म्हणता येईल.