fbpx

Breaking News : पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुडगूस घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित हे विजयी झाले आहेत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव करत राजेंद्र गावित यांनी विजय संपादन केला आहे.

पालघर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव उतरले होते. अखेर जनतेने शिवसेनेचे राजेंद्र गावित यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे.

पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांना ५६९०३५ एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार बळीराम जाधव यांना ४८३०९० एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या अटीतटीच्या लढाईत राजेंद्र गावित यांनी ८५९४५ मतांनी बाजी मारली आहे, अस म्हणता येईल.