fbpx

Breaking News : महाराष्ट्रा बाहेर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, लक्षद्वीपमध्ये मोहमद फैझल ४०२ मतांनी विजयी

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीने महाराष्ट्रा बाहेरील मतदारसंघात विजय मिळवला आहे. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रवादीचे उमेदवार मोहमद फैझल यांनी ४०२ मतांनी विजय मिळवला आहे.

लक्षद्वीप या मतदार संघातून राष्ट्रवादीचे मोहमद फैझल यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने हेमदुल्ला सईद यांना उतरवण्यात आले होते. अखेर जनतेने राष्ट्रवादीच्या मोहमद फैझल यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे.

लक्षद्वीपच्या या प्रतिष्ठेच्या लढाई मध्ये विजयी उमेदवार मोहमद फैझल यांना १७५११ एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार हेमदुल्ला सईद यांना १७०१ एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या अटीतटीच्या लढाईत मोहमद फैझल यांनी ४०२ मतांनी बाजी मारली आहे.