fbpx

राज्यात ४८ पैकी ४२ जागांवर महायुती आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात ४८ जागांवर निवडणूक झाली आहे. त्यापैकी ४२ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाआघाडी ७ जागांवर आघाडीवर आहे. तर वंचित बहुजन अआघाडी १ जागांवर आघाडीवर आहे.

सकाळी ८ वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. दरम्यान एनडीए ३०५ तर युपिए ११६ आणि इतर ११० जागांवर आघाडी वर आहे.
तर राज्यात भजपा २२, शिवसेना २०, कॉंग्रेस १ तर राष्ट्रवादी ५ आणि वंचित १ जागांवर आघाडीवर आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तर जेष्ठनेते सुशील कुमार शिंदेही पिछाडीवर आहेत. तर भजापा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीचे शरद पवारांचे नातू पार्थ पवार ४० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तसेच औरंगाबादमधून वंचित आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर आहेत.