fbpx

Breaking News : मावळ मतदारसंघातून पार्थ पवार ४४ हजार मतांनी पिछाडीवर

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार मावळ लोकसभा मतदार संघातून ४४ हजार मतांनी पिछाडीवर असून श्रीरंग बारणे यांनी जोरदार आघाडी घेतली आहे.

या लोकसभा निवडणुकीला मावळ मतदारसंघातून आघडीकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात युतीकडून श्रीरंग बारणे यांना उतरवण्यात आले होते. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार जनतेचा कल हा श्रीरंग बारणे यांच्या बाजूने असल्याच दिसत आहे.

Live Updates महाराष्ट्र -: भाजप : २३ , शिवसेना : १९, राष्ट्रवादी : ४ कॉंग्रेस : १ , वंचित : १