लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी आज (गुरुवार) तहकूब करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांना गोंधळास सुरवात केली. समाजवादी पक्षाच्या (सप) सदस्यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या समोर जाऊन कागदपत्रे फाडली. या गोंधळामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. 12 वाजल्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरवात केली. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.