लोकसभेसाठी पहिल्या टप्यासाठी मतदान आज , गडकरी, पटोले, अहिरांची प्रतिष्ठा पणाला

टीम महाराष्ट्र देशा: लोकशाहीच्या कुंभमेळ्याला आज सुरुवात झाली आहे, लोकसभेसाठी पहिल्या टप्यातील मतदान सध्या पार पडते आहे. विदर्भातील ७ जागांसह देशभरातील ९१ मतदारसंघात मतदान होणार आहे, नागपूर, रामटेक, गडचिरोली चिमुर, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचा पहिल्या टप्यात समावेश आहे.

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे, गडकरींच्या होमग्राउंडमध्ये पटोले यांनी आव्हान उभे केले आहे. तर चंद्रपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना शिवसेना बंडखोर आणि कॉंग्रसचे उमेदवार असणारे बाळू धानोरकर यांचा सामना करावा लागणार आहे.

Loading...

यवतमाळ – वाशीममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी विरुद्ध कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये लढत होत आहे, तर आ बच्चू कडूंच्या प्रहारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना मैदानात उतरवले आहे.

विदर्भात शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या रामटेक मतदारसंघात सेनेचे कृपाल तुमाने विरुद्ध कॉंग्रेसचे किशोर गजभिये लढत होत आहे. दरम्यान सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी १० – १२ टक्के मतदान झाले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ