fbpx

मी मुख्यमंत्र्यांसोबत लावलेली पैज जिंकणारच – सुजय विखे

टीम महाराष्ट्र देशा : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये पैज लागली होती. राज्यात मी पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईल, असं त्यांना सांगितलं होत. आताचे कल पाहता राज्यातील पहिल्या तीन सर्वाधिक मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये मी असेन,’ असा विश्वास अहमदनगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज व्यक्त केला आहे.

सुजय विखे हे मोठ्या विजयाच्या अगदी जवळ आले असून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना तब्बल १ लाख ८४ हजार ००२ मतांनी पिछाडीवर सोडलं आहे.