लोकसभेचा असा निकाल अपेक्षित नव्हता – प्रफुल पटेल

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीच्या निकाला वरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी भाष्य केले आहे. भाजपा सरकारवर शेतकरी, बेरोजगार युवक प्रचंड नाराज होते. अशा स्थितीत निवडणुकीचा असा निकाल अपेक्षित नव्हता. असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले आहे.

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. देशात पुन्हा एकदा एनडीए ने विजय मिळवला आहे. दरम्यान या निकालावरून प्रफुल पटेल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. शहरासह गावात जे वातावरण होते ते भाजपच्या विरोधात होते. विशेषत: शेतकरी, बेरोजगार युवक प्रचंड नाराज होते. अशा स्थितीत निवडणुकीचा असा निकाल असा अपेक्षित नव्हता. असे पटेल यांनी म्हंटले.

Loading...

इतकेच नव्हे तर, लोकसभेच्या निकालानंतर यावर नेमके काय बोलायचे याबाबत आम्ही सर्वच निरूत्तर आहोत. गावागावातील वातावरण व राष्ट्रवादी पक्षासह मित्र पक्षांनी केलेल्या पाहणीदरम्यान जनमताचा कौल हा भाजपविरोधी होता. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे जितक्या फरकाने पराभूत झाले, तेवढा आम्ही विचारदेखील केला नव्हता. विशेषत: तिरोडा व मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात मतांचे अंतर अचंबित करणारे आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर क्षेत्र वगळल्यास सर्वच ठिकाणी मतांचा कौल आमच्या बाजूने राहील, असे सर्वेक्षणातून वाटत होते. याबाबत मी स्वत:ही पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीने सत्यता पडताळून पाहिली होती. परंतु हाती आलेला निकाल आम्हाला निरूत्तर करून गेला. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, विरोधकांकडून ईव्हीएमवर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, ईव्हीएम मशीनबाबत आमचा आक्षेप नाही. परंतु मागील दोन महिन्यात तब्बल तीनवेळा देशभरातील २२ राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र आमच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच भविष्यात निवडणुकीदरम्यान दुसरा पर्याय काय आहे? यावर विश्लेषण व चर्चा होणे गरजेचे आहे. असेही पटेल यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला