fbpx

‘हॅलो बाबा’… प्रीतम मुंडेंच्या निर्णायक आघाडीनंतर पंकजा मुंडेंचे भावनिक ट्विट

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे या ४२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक ट्विट करत सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.

पंकजा यांनी लहानपणीचा फोटो ट्विट करत हातात फोन घेतलेला आहे आणि त्यांच्या शेजारी प्रीतम बसल्या आहेत. पंकजा यात फोनवर बोलत असून त्यांनी फोटोला ‘हॅलो बाबा’ असं कॅप्शन दिलं आहे.

पंकजा मुंडे यांनी यातून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली असून प्रितम यांनी आघाडी घेतली असल्याचं सूचित केलं आहे. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे बजरंग सोनावणे आणि प्रीतम मुंडे यांच्यात लढत होत आहे.