नागपुरात होणार लक्ष्यवेधी लढत,गडकरींच्या समोर असणार पटोलेंचे आव्हान

Nana-Patole

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज दुसऱ्या दिवशी छाननी समितीची दिल्लीत बैठक घेतली. यावेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवण्यास तयारी दाखवली आहे. त्यामुळे देशाला नागपूरकरमध्ये एक हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. कारण या लढती मध्ये कधी काळी सहकारी असणारे नाना पटोले आणि भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Loading...

कॉंग्रेसच्या छाननी समिती समोर नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवण्यास होकार दिला आहे. त्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढण्यास मी होकार दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणे झाले आहे.

दरम्यान नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे सहकारी होते. पण येत्या निवडणूकीच्या तोंडावर नाना पटोले यांनी भाजपची साथ सोडत कॉंग्रेसचा हात पकडला आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...