fbpx

ब्रेकिंग : पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी, तर शरद पवारांची माढ्यातून माघार

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी माघार घेतली असून नवीन दमाच्या उमेदवारांना संधी देण्यासाठी मी माघार घेत आहे असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. कुटुंबातील सर्वच उमेदवार नकोत असा कुटुंबात विचार झाला. त्यामुळे नवीन दमाच्या उमेदवाराला संधी देवून मी थांबणार आहे असं पवारांनी सांगितले.

पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेवून पवार यांनी याबाबतची माहिती दस्तुरखुद्द पवारांनी दिली. दरम्यान मावळ मधील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पार्थ पवार या लोकसभेत मावळ मतदार संघातून लढणार आहेत असं पवारांनी स्पष्ट केलं.

यावेळी शरद पवार यांनी स्वतः या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संकेत दिले आहेत.तर सुजय विखे भाजप मध्ये प्रवेश करत असतील तर आघाडीला याचा काहीच फटका बसणार नाही अस देखील ते म्हणाले.