एक नेता एक आवाज… उदयन महाराज… उदयन महाराज

udyanraje bhsole

सातारा- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आज देशातील जनतेने कोणाला पुढील पाच वर्ष सत्ता दिली आहे हे स्पष्ट होणार आहे. पहिल्या फेरीचे कल जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी 47 जागांचे कल जाहीर झाले आहेत. त्यापैकी तब्बल 38 जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

देशात मोदी लाट असताना सातारा लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे प्राथमिक मतमोजणीमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर त्यांनी मतमोजणी सुरु झाल्यानंतर दीड तासांनी ९ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. राजेंविरोधात साताऱ्यामधून भाजपा-सेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे सहदेव एवळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पहिल्या दीड तासांमध्ये उदयनराजेंना २७ हजार ८७६ मते मिळाली असून नरेंद्र पाटील यांना १८ हजार २४८ मते मिळाली आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत