fbpx

निकालच्या दिवशी शिवसेनेचे मौन, माध्यमांसमोर न येण्याच्या नेत्यांना सूचना

udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल आवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, निकालाच्या दिवशी शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये असे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील आयोजित बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत.

संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते 40 जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचदरम्यान, आज मुंबईत शिवसेना नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत मतमोजणी दरम्यान शिवसनेच्या कुठल्याही नेत्याने माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये. अशा सूचना शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर, शिवसेना नेत्यांना मतमोजणीचे सगळे कल समोर येऊ पर्यंत माध्यमांसमोर जाण्यासही निर्बंध घातले आहेत.