स्त्रियांचा अवमान करणाऱ्यांची निवडणूक उमेदवारी रद्द करा – आठवले

ramdas-athawale

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप च्या रामपूर मधील लोकसभा उमेदवार जयाप्रदा यांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आझम खान यांच्या वृत्तीचा वक्तव्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.

जयप्रदा यांचा हीन शब्दात अवमान केल्या केल्याप्रकरणी समाजवादी चळवळीतून आलेल्या आझम खान सारख्या नेत्यांनी असे हीन वक्तव्य करणे निंदनीय आहे. स्त्रियांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक लढण्यास बंदी घातली पाहिजे. आझम खान यांचीही उमेदवारी रद्द केली पाहिजे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.