आपल्या पाठीवर जन्म घेतलेल्या लहान बहिणीची पात्रता काढण किती योग्य ? पंकजा मुंडेंचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. यामध्ये देशाचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा जागेसाठी मुंडे भाऊ बहिण पुन्हा एकदा समोरा-समोर आले आहेत. आष्टी तालुक्यात भाजपच्या बीड लोकसभा जागेसाठी रिंगणात असणाऱ्या प्रितम मुंडे यांच्या प्रचारासाठी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे सभा घेतली यावेळी त्यांनी विरोधकांसह धनंजय मुंडे यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं.

“छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र जिथे महिलांचा आदरच केला जातो अशा राज्यात तुम्ही आपल्या पाठीवर जन्मलेल्या आपल्च्या लहान बहिणीवर टीका करता तिची पात्रता काढता हे कितपत योग्य आहे ?” असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेना चांगलच फैलावर घेतल आहे.

प्रितम मुंडे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची जाहीर सभा

प्रितम मुंडे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची जाहीर सभा , बीड मधील गुन्हेगारीवर काय बोलणार ?

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2019

तर , प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे उठलेल्या वादळावर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “प्रितम आणि पंकजा या गोपीनाथ मुंडेंच्या लेकी आहेत त्याचं नाव लावू नका म्हणता ही तुमची संकृती आहे का ? असा सवाल करत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तर आमचा बाप उसतोड कामगार असता तरी आम्ही त्याचंच नाव लावलं असत अस देखील पंकजा मुंडे म्हणल्या आहेत.