एनडीएला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील ; चंद्रकांत खैरेंची भविष्यवाणी 

Chandrakant-Khaire

टीम महाराष्ट्र देशा : एनडीएला ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार असा विश्वास खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोल नंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. आता संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते ४० जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी  ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Loading...

याचदरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एनडीएला ३०० किंवा ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. आघाडीत कोणाला पंतप्रधान करायचा हेच आजून स्पष्ट नाही. सगळे मला – मला करत आहेत. असे चंद्रकांत खैरे यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, मी ५५ हजार ते एक लाख मतांनी निवडणून येणार आहे. अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केली.

विशेष म्हणजे, प्रसार माध्यमांच्या एक्झिट पोल नुसार औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करणार असून चंद्रकांत खैरे  आपली जागा कायम ठेवणार असल्याचे दिसून आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार