ब्रेकिंग : अजित पवारांना मोठा धक्का, पार्थ पवारांचा दारुण पराभव

मावळ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत, बारणे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला आहे. बारणे यांनी तब्बल जवळपास २ लाख मतांनी पार्थचा पराभव केला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत, देशभरात एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. केवळ भाजप 291 मतदारसंघात आघाडीवर आहे. महाराष्ट्रत देखील भाजप – शिवसेना युतीला दणदणीत यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार युती 43 जागांवर तर आघाडी केवळ 4 जागांवर विजयी होताना दिसत आहे. यामध्ये काँग्रेसला भोपळा देखील फोडता आलेला नाही.

मावळ लोकसभा मतदारसंघात संपूर्ण पवार घराण्याची प्रतिष्ठापणाला लागली होती. यामध्ये अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा दारुण पराभव केला आहे.