पानशेत पूरग्रस्तांचा गिरीश बापटांना पाठींबा, पुणे कॉंग्रेस सरचिटणीस भाजपात

टीम महाराष्ट्र देशा: पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांना मिळणारा पाठींबा वाढताना दिसत आहे, वेगेवगळ्या क्षेत्रातील संघटनांच्या पाठींब्यानंतर आता पानशेत पूरग्रस्तांचा समितीने  पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांना  पाठींबा दिला आहे. पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेस सरचिटणीस मंगेश खराटे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मंगेश खराटे हे गेली २० वर्षापासून पानशेत पूरग्रस्तांसाठी काम करत आहेत. पक्षप्रवेशानंतर खराटे म्हणाले, 20 वर्षे सरकारदरबारी पानशेत पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी झटत आहे. भाजप सरकारने पुरग्रस्तांचे अनेक प्रश्न मार्गी लावले त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे जेष्ठ नेते माधव भंडारी यांनी या कामी मोठी मदत केली त्याबद्दल खराटे यांनी या दोन्ही नेत्यांचे आभार मानले.