विरोधकांना वाटत होते मी दवाखान्यातून परत येणारच नाही – खडसे

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : विरोधकांना वाटत होते मी दवाखान्यातून परत येणारच नाही. परंतु त्यांना मी पुढे घालीन मगच मी जाईन, अशी तोफ माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी डागली.रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारसभेत खडसे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

प्रकृती अस्वस्थेमुळे मुंबई येथे उपचार घेत असलेले एकनाथ खडसे शनिवारी पहाटे मुक्ताईनगर येथे दाखल झाले. मुक्ताईनगर येथे येताच त्यांनी प्रचारात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी माध्यमांना कळविले होते.दरम्यान, बोदवड येथे सभेत बोलताना खडसे यांनी तुफान फटकेबाजी केली.

विरोधकांना वाट होते की, नाथा भाऊ दवाखान्यातून परतच येणार नाही व प्रचारात सहभागीही होता येणार नाही. परंतु मी जनतेच्या आशीर्वादाने आज येथे उभा असल्याचेही ते म्हणाले.