‘आमच्या भगिनी एवढ्या निष्क्रिय आहेत की वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवलं’

केज (प्रतिनिधी) : दोन्ही बहिणींना दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळी सत्ता असतां काहीच करता आले नाही. या भगिनीं एवढ्या निष्क्रिय आहेत की वारसा हक्काने मिळालेल्या वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवलं. पालकमंत्री पंकजाताई म्हणायच्या की वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथ मुंडेचा आत्मा आहे. त्यांच कारखान्याच्या जागेवर गोपीनाथ गड आहे. असा घणाघात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना लगावलाय आहे.राष्ट्रवादी -काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी केज तालुक्यांतील नांदूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

दरम्यान, माझा जन्म मुंडे साहेबांच्या पोटी झाला नाही म्हणून अन्याय करणार का ? पंडित अण्णांनी लहान भावला मोठं करण्यासाठी अख्खी हयात घालवली त्यांच्या मुलांवर अन्याय करणार कां ? दोन बहिणींनी सत्तेत असतांना काय दिलते सांगा नंतर मतदान करा अस देखील मुंडे म्हणाले.