पंकजाताई, तुम्ही कोणा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार ? – धनंजय मुंडे

गेवराई (प्रतिनिधी) : उठसूट आमच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या बहीणबाई विधानसभा निवडणुकीत कोणा कोणाच्या पाठीत खंजीर खूपसणार ? गेवराईत लक्ष्मण पवार की बदामराव पंडित, आष्टीत भिमराव धोंडे की सुरेश धस, माजलगावात आर.टी.देशमुख की मोहन जगता पयाचा आदी जवाब द्या. माझ्या विरोधात लढण्याची आमच्या बहीणबाईची ईच्छा विधानसभेला पूर्ण करतो. कोण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतो हे येणाऱ्या विधानसभेला कळेल. माझे आणि अमरसिंह पंडित यांचे नाते राजकारणापलीकडचे आहे. आमच्या मैत्रीचा तुमच्या पोटात का गोळा उठतो ? बीड जिल्ह्यातील राजकीय भिष्माचार्य शिवाजीराव दादावर गुन्हा नोंदवून बहिणबाई तुम्ही गंभीर चूक केली असून दादावर प्रेम करणारा जनसागर तुम्हाला आता घरी पाठवल्या शिवाय गप्प बसणार नाही असा घणाघाती हल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी व काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ गेवराई तालुक्यातील चकलंबा येथील जाहिर सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस (आय), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी(कवाडे गट) मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ चकलंबा येथे ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जि. प. सदस्य विजयसिंह पंडित, माजी आमदार ऊषाताई दराडे, काँग्रेस (आय) चे तालूकाध्यक्ष सुरेश हत्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेवराई तालूकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, ज.स.सा.का.उपाध्यक्ष जगनाथराव शिंदे, मोहम्मद गौसभाई, सभापती जगन पाटील काळे, माजी सभापती कूमारराव ढाकणे, डॉ.विजयकुमार घाडगे, शेख तय्यबभाई, ऋषिकेश बेदरे, मंसूर शेख, ह.भ.प.किसन महाराज, इर्शाद भाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढे बोलताना म्हणाले कि, कर्जमाफीच्या थापा मारणारांनो कर्जमाफी कशी करायची हे शरदचंद्र पवार साहेबांकडून शिका. नैतिकता हा साहेबांच्या राजकारणाचा पाया राहीला आहे असे सांगत ते म्हणाले की, मागील निवडणूकीत मोदीच्या खोट्या आश्वासनांना भूलून तरुणांनी विद्यमान खासदारांना निवडून दिले तर विद्यमान खासदाराने लोकसभा क्षेत्रामध्ये न फिरताच नाशिक, मुंबई व दिल्ली येथे जाऊन खासदारकी मिरवली. त्या विसरल्या कि याच लोकांची पून्हा गरज आहे.

आता निवडणूक आल्यावर यांना पून्हा मतदार राजा आठवू लागला आहे. मतदारांची ऐवढीच काळजी असेल तर आपला संपूर्ण खासदार निधी का वापरला नाही ? रेल्वे डबे बनवण्याचा कारखाना लातूरला का गेला ? ऊसतोड मजूरांसाठी काय केले ? बीडचे ७८ सिंचन प्रकल्प पूर्ण का केले नाही ? असे सवाल करत अशा निष्क्रिय खासदाराला व देशातील तरुणांना भूलथापा देणा-या सरकाराला घरी बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी(कवाडे गट)मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. बजरंग सोनवणे हे रस्त्यावर चालणारे आहेत तर प्रितम या हेलीकॉप्टर असा टोला लगावत लोकसभा विधानसभेची पूर्वतयारी आहे असेही ते म्हणाले.

यावेळी अँड.ऊषाताई दराडे, अँड.सुरेश हत्ते, विजयसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, भागवत महानोर, गणेश वडते, भागवत गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या़च्यासह चकलांबा व परीसरातील मतदार बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'