माझं राजकीय वजन वाढलं म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागलं-धनंजय मुंडे

dhanajay munde pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा : माझं राजकीय वजन वाढलं त्यामुळेच बहिणीच्या पोटात दुखू लागलं असा टोला विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना लगावलाय आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, निवडणुकीआधी मी कष्टानं माझ शरीरिक वजन कमी केले. लोकसभेचा आणि त्याचा काय संबंध. पण प्रचार सभेत माझ्या वजनाचा विषय येत आहे. पण माझं राजकीय वजन वाढल म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागले, कळा निघायला लागल्या आहेत असंही ते म्हणाले.

दरम्यान, मला पक्षाने विश्वास टाकून जबाबदारी दिली. माझं काम तुम्ही पाहिले सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारशी दोन हात केले. त्यामूळे मी माझं नाव कमावलं. पण काहींच्या पोटात दुखायला लागलं. राष्ट्रवादी -काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी केज तालुक्यांतील नांदूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.