fbpx

लोकसभा २०१९: आपने जाहीर केली उमेदवारांची यादी

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपने जाहीर केली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आपने सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेस पक्ष आपसोबत आघाडी करण्यास तयार नाही. त्यामुळे आज आपने दिल्लीतील सात पैकी सहा जागांवर त्याचे उमेदवार जाहीर केले. दिल्लीतील आपचे प्रवक्ते गोपाल राय यांनी आज उमेदवारांची यादी जाहीर केली. आपकडून अनेकदा काँग्रेस नेत्यांना आघाडी बाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने दाद न दिल्याने आज आपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

आपकडून अतीशी मारलेना, गग्गन सिंग, राघव चढ्ढा, पंकज गुप्ता, दिलीप पांडे आणि ब्रिजेश गोयल यांना दिल्लीतील सहा जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच लवकरच उरलेल्या एका जागेवर उमेदवार घोषीत करू असे राय यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला आघाडीबाबात विचारणा करून कंटाळलो असल्याचे वक्तव्य केले होते.