लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. लोकायुक्ताच्या नव्या कायद्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे आज सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीनंतर उपोषण मागे घेतले.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली .

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले आहे.
अण्णा हजारे यांनी गेल्या सात दिवसांपासून लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मुद्यांसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले होते. त्यांच्या या उपोषणादरम्यान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत