प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राचा लोकमान्य टिळकांवर चित्ररथ

मुंबई : 26 जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये लोकमान्य टिळकांवर चित्ररथ साकारण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये सर्व राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. यावर्षी महाराष्ट्राकडून लोकमान्य टिळकांवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.

लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना केली होती. या सिंहगर्जनेचं सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यामुळे या चित्ररथातून लोकमान्य टिळकांना आदरांजली देण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राचा लोकमान्य टिळकांवर चित्ररथ

You might also like
Comments
Loading...