दुःखाचा डोंगर कोसळलेल्या सगरे कुटुंबाला लोकमंगलने दिला मदतीचा हात

subhash deshmukh

सांगली – सांगली जिल्ह्यातल्या विटा येथील लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखेत कार्यरत असणारे कॅशियर धनंजय सगरे यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. सगरे यांच्या पत्नी या गृहिणी असून त्या काही कमावत नाहीत आणि त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. सामान्य स्थिती आणि घरात कमावते एकटेच त्यामुळे या कुटुंबावर संकटाचा पहाडच कोसळला.

अशा घटनांत कुटुंबियांना धक्का बसलेला असल्याने मानसिक आधाराची तर गरज असतेच पण कसलीही बचत नसलेल्या आणि उत्पन्नाचे दुसरे साधन नसणाऱ्या  अशा कुंटुंबाची आर्थिक दृष्ट्या मोठीच कुचंबणा होत असते.

अशा प्रसंगात त्या कुटुंबाला मदतीचा हात देणे आणि उभे करणे हे मल्टीस्टेटच्या व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे असे मानून व्यवस्थापनाने त्यांच्या आरोग्याच्या विम्याची भरपाई मिळवून दिली. मॅक्स लाईफ विमा कंपनीचे विमा संरक्षण सगरे यांना होते. त्यांचे भरपायीचे प्रकरण आकस्मिक निधनाच्या सदरात बसवून सगरे यांना पाच लाखाची विमा भरपाईची रक्कम मिळवून देण्यात आली.

सदर भरपाईची रक्कम पाच लाख रुपये धनंजय सगरे यांचा गिरीश याच्या नावाने लोकमंगलच्या ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यात आली. या ठेवीच्या व्याजाच्या रूपाने श्रीमती सगरे यांना दरमहा काही रक्कम मिळत राहील आणि त्यांच्या उपजविकेचा प्रश्न राहणार नाही.

आपल्या सोबत काम करणाऱ्या  कर्मचार्यांच्या जीवनाला विम्याचा आधार असला पाहिजे असा लोकमंगलचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांचा आग्रह असतो. अशा प्रकारे विम्या त्यामुळेच ही रक्कम सगरे कुटुंबाला मिळू शकली.

खरे तर असा आरोग्य विमा उतरवणे हे कर्मचाऱ्याला परवडतेच असे नाही. कारण त्यांचे हप्ते मोठे असतात. म्हणून लोकमंगलच्या प्रशासनाने असे निर्णय घेतला आहे की, आरोग्य विम्याचा हप्ता भरणे कर्मचाऱ्याला परवडणारे नसेल तर निम्मा हप्ताच त्यांनी भरावा आणि निम्मा प्रशासन भरेल. अशा रितीने लोकमंगलचा प्रत्येक कर्मचारी हा आरोग्य विम्याने संरक्षित आहे. या संबंधात कर्मचारी आणि कामगारांत समाधान व्यक्त होत आहे.

आरोग्य विमा किंवा अन्य कोणताही विमा उतरवला असला तरी शेवटी विम्याची भरपायीची रक्कम ताबडतोब मिळत नाही आणि घरातला कर्ता पुरूष असा गेला की कुटुंबाला ताबडतोब आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणून लोकमंगल मल्टीस्टेटमध्ये अशा प्रसंगात मल्टीस्टेटच्या प्रशासनाकडून पाच हजार रुपयांची आणि कर्मचारी सहकारी पतसंस्थेतून पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येते.

सगरे कुटुंबियांना गिरीश सगरे याच्या नावाची पाच लाखाची ठेव पावती देण्यात आली. या कुटुंबियांकडून आमदार सुभाष देशमुख, चेअरमन रोहन देशमुख, अविनाश महागावकर, शशिकांत जगताप, योगेश शिनगारे यांना धन्यवाद देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?

आघाडीत बिघाडी : सरकार आघाडीचे आहे याची काळजी घ्या, राहुल गांधींच्या खास व्यक्तीने खडसावले

ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना, मुंबईत गुन्हा दाखल

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही राज्यात मुलींचीचं बाजी