जयदत्त क्षीरसागर यांनी बोलावली समर्थकांची महत्वाची बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदार संघात अतिशय चुरशीची लढाई भाजपच्या प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात होत आहे. मात्र या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या लढाईत राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका काय असणार याबाबत राष्ट्रवादी मध्ये संभ्रम असल्याने पक्षाला प्रचारात अडचणीचा सामना करावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर 5 एप्रिल रोजी बीड येथील आशीर्वाद लॉन्स येथे दुपारी तीन वाजता जिल्हाभरातील आमदार जयदत्त क्षीरसागर नगराध्यक्ष डॉ. भूषण क्षीरसागर समर्थकांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जिल्हाभरात जयदत्त क्षीरसागर समर्थकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला होता.

https://www.youtube.com/watch?v=2mu3oO8yk_E

कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी पाच एप्रिल रोजी आशीर्वाद लॉन्स येथे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात शिरसागर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व याच वेळी आपली भूमिका मांडणार आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या व्यापक बैठकीला संपूर्ण जिल्ह्यातील समर्थकांची उपस्थित राहणार असून यावेळी आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांचा भाजपला छुपा पाठींबा असून ते येत्या काही काळातच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ५ एप्रिलच्या मेळाव्यात आमदार जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार याकडे राष्ट्रवादी आणि भाजपसह राज्याचे लक्ष लागले आहे.