fbpx

लोकसभा निवडणुकीचे मतदान तीन टप्प्यांमध्ये ?

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते अशी चर्चा आहे. तर मतमोजणी मे महिन्यात होऊ शकते. लोकसभा निवडणुकीचे मतदान तीन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक दिल्लीत घेतली जात आहे. निवडणूक आयुक्तांनी याआधी देशातील राज्यांचा दौरा केला होता. त्यामध्ये त्यांनी तेथील निवडणुकींचा आढावा घेतला होता. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे.