fbpx

लोकसभा निवडणूक २०१९: सपा-बसपाची महाराष्ट्रातही आघाडी.

टीम महाराष्ट्र देशा: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. भाजप आणि कॉंग्रेसने वेगवेगळ्या राज्यात स्थानिक पक्षांशी युती केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांची युती आहे. तीच युती महाराष्ट्रासह इतर राज्यातही कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील सर्व म्हणजेच ४८ जागा लढवण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी लवकरच यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल.

महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर आम्ही आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केला होता परंतु कॉंग्रेस आम्हाला एकही जागा सोडायला तयार नसल्याचं समाजवादीचे नेते अबू आझमी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याचं ठरवले आहे असही ते म्हणाले. सपा-बसपाचा महाराष्ट्रातील दलित मतांवर डोळा आहे, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.