fbpx

आगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात ?

loksabha

वी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी चालू आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुक तारखा निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार असल्याची माहिती हाती येत आहे. त्यानुसार या निवडणुका सहा ते सात टप्प्यांत होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

२०१४च्या लोकसभेचा कार्यकाल हा 3 जूनला संपुष्टात येणार आहे. येत मे महिन्यातच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. 2014 लोकसभेची निवडणूक 9 टप्प्यांत झाली होती. ही निवडणूक 7 एप्रिल ते 12 मे या दरम्यान झाली होती. सध्या आगामी लोकसभा निवडणुका देशात किती टप्प्यांत घ्यायच्या, याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असल्याचे समजते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी समजते आहे की, सुरक्षा दलाच्या उपलब्धतता आणि सुरक्षा व्यवस्था यावर मतदान किती टप्प्याचा घ्यायचे हा निर्णय घेतला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार केला जात आहे. तसेच जम्मू- कश्मीरमध्येही निवडणूक घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते आहे.