लोकसभेचा निकाल ६ दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता !

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान व घोटाळे टाळण्यासाठी ईव्हीएम मशीनला नव्यानेच व्हीव्हीपॅट लावण्यात आले आहेत. मात्र आता या निवडणुकीत व्हीव्हीपॅट हा नवीन वादाचा मुद्दा ठरत आहे. कारण काँग्रेस आणि अन्य २१ विरोधी पक्षांनी ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे. याबाबत आयोगाकडून असे स्पष्टीकरण देण्यात आले की, जर अर्ध्या व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली तर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास ६ दिवसांचा वाढीव कालावधी लागू शकतो.

यावेळी निवडणूक आयोगाकडून असे सांगण्यात आले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणात सक्षम कर्मचारी वर्गाची आवश्यकता असते. तसेच पडताळणीचे काम करण्यासाठी मोठ्या सभागृहांची आवश्यकता आहे. मात्र काही राज्यांमध्ये अशा प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे ५० टक्के व्हीव्हीपॅटच्या पडताळणीच्या मागणीला दुजोरा दिल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल २८ किंवा २९ मे रोजी लागेल.

दरम्यान, व्हीव्हीपॅट मोजण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा, अशी याचिका २१ विरोधी पक्षांच्या वतीने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका दाखल करताना टक्के व्हीहीपॅटची मोजणी केली जावी, अशी मागणीदेखील मांडली आहे. मात्र, या मागणीला निवडणूक आयोगाकडून तूर्तास तरी लाल झेंडाचं दाखवण्यात आला आहे.