लोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी

blank

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेची तयारी सध्या प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या परीने करताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, माढा, उस्मानाबाद लोकसभेची खलबत मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील घरी रंगताना पाहवयास मिळाली आहेत.

अनगर येथील राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, मोहळचे माजी आमदार राजन पाटील , जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्यात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे समजते आहे.

माढा लोकसभेला विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या मोहिते पाटील यांचे लोकसभा मतदार संघात गाठी भेटी चालू असल्याचे समजते आहे. त्याचाच एक भाग म्हणून हि भेट असल्याचे समजते आहे.

बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचे नाव उस्मानाबाद लोकसभेसाठी वरिष्ठ स्तरावरून घेतले जात आहे. त्यात सोपल हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे तिथे कोणाला तिकीट मिळणार अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विजयसिंह मोहिते पाटील, राजन पाटील , दिलीप सोपल , बबनदादा शिंदे हे शरद पवारांचे निष्ठावंत समर्थक मानले जातात. शरद पवार यांचा शब्द यांच्यासाठी फायनल मनाला जातो. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय व्यूव्हरचना असेल याबात यांच्यात चर्चा झाल्याचे समजते आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना याबात कळवण्यात येणार असल्याचे कळते आहे. त्यानंतर पवार जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असले समजले आहे.

शोध व्यक्तिमत्वाचा :