fbpx

होय… वसंतदादांचं घराण मीच फोडलं – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप असणाऱ्या घराण्यापैकी एक असलेले वसंतदादा यांच्या घाण्यात झालेल्या बंडखोरीत माझाच हात असल्याच वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सांगलीच्या जागेंसाठी कॉंग्रेसेकडे उमेदवार नसल्याने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेही चांगला उमेदवार नाही. त्यामुळे भाजपचा याठिकाणचा विजय निश्चित झाला आहे. वसंतदादा घराण्याने बंडखोरीचा इशारा दिला असेल आणि त्यामागे माझा हात असल्याची चर्चा केली जात असेल तर मी त्या गोष्टी स्वीकारत आहे. अशा चांगल्या गोष्टीत माझा हात नक्कीच असतो. अस चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.