नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृषी कायदा अखेर मागे घेण्यात आला असून तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही विधेयकं रद्द करण्यात आली. यावेळी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर(Narendra Singh Tomar) यांनी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक पटलावर सादर करताच विरोधकांनी मोठा गोंधळ केला. या गोंधळातच हे विधेयक पारित झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाची सुरूवात गदारोळाने झाल्याने सभागृहाचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज १२ पर्यंत स्थगित केले आहे. विरोधकांनी गदारोळ सूरू करताच सभापतींनी सर्व खासदारांना संसदेच्या प्रतिष्ठेचा मान ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र तरी देखील विरोधक शांत होत नसल्याचे पाहता त्यांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
The Farm Laws Repeal Bill, 2021 passed by Lok Sabha amid ruckus by Opposition MPs
Leader of Congress Party in Lok Sabha Adhir Ranjan Chowdhury demands discussion on the Bill in the House pic.twitter.com/2QAyOAVGq1
— ANI (@ANI) November 29, 2021
दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधताना अधिवेशनादरम्यान सर्व खासदारांना गदारोळ न करण्याचे आवाहन केले होते. तसेच संसदेच्या या अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’