विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज २२ जुलैपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : काल दि.१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, कोरोना महामारीचे संकट रोखण्यात आलेले अपयश, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकरीविरोधी कायदे या मुद्दय़ांवर विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे मोदी सरकारसमोर हे अधिवेशन विना अडथळा पार पाडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

अशातच पेगासास प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून आज दुसऱ्या दिवशी देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज २२ जुलै ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं आहे. प्रश्नोत्तराच्या तासात केवळ एका प्रश्नाचे उत्तर देण्यात आल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले. पण गोंधळ वाढल्याने २२ जुलैपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पेगॅसस प्रकरणावरुन विरोधक जोरदार आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहे. आज लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विरोधकांच्या आक्रमकतेमुळे कामकाज तहकूब करावे लागले. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला नाराज झाले. त्यांनी सांगितले की, विरोधकांना ज्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे त्यांनी त्याबाबत नोटीस द्यावी. सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे. प्रत्येक वेळी अशी घोषणाबाजी करणे योग्य नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP