संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

pegasus

नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरी प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही, संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. त्यामुळं राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी सदस्य-पेगॅसस हेरगिरी, शेतीविषयक कायदे आणि कोविड सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत आहेत; मात्र सरकारने हट-वादी पध्दत-अवलंबत; चर्चेपासून पळ काढला आहे; असा आरोप-कॉंग्रेसचे गट-नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. तर विरोधक आपल्या वर्तणुकीने सभागृहाला कामकाज करू देत नाहीत आणि ही वर्तणूक अतिशय निराशाजनक असल्याचं; संसदीय कामकाज मंत्री-प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकार कडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंग ची गरज नाही. पेगॅसिस बाबत चा केंद्र सरकार वरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशी ही जो संसद सदस्य आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल अशा गोंधळी खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या