लोहारा : आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीसाठी ६५ लक्ष मंजूर

उदगीर : लोहारा गावांमधील आरोग्य केंद्राची इमारत अतिशय जीर्ण झाली होती. याच्या दुरुस्तीसाठी दोन वेळा निधी आला होता परंतु, जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल केंद्रे यांनी ती नाकारत नवीन इमारतीची मागणी लावून धरली होती. त्याला अखेर यश मिळाले असून नवी इमारती ब तब्बल ६५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीची परिस्थिती अतिशय जीर्ण झालेली असल्याने व केंद्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची क्वार्टरची सुद्धा परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. दोन वर्षापासून या उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने पहिल्या वर्षी एक लक्ष दुसऱ्या वर्षी दीड लक्ष असा आणि निधी मंजूर केला होता. पण या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य राहुल केंद्रे यांनी हा निधी नाकारला होता. याचे कारण म्हणजे इमारतीला ४० वर्ष पूर्ण झाली होती व इमारतीचे दरवाजे, खिडक्या इमारतीच्या चारी बाजूच्या भिंती, पूर्णपणे निकामी झाल्या असल्याने राहुल केंद्रे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला व आरोग्य विभागाला पत्र देऊन हा निधी मी स्वतः नाकारत असल्याचे कळविले होते. कारण, तुटपुंज्या निधीमुळे काहीही होऊ शकणार नाही व शासनाचा पैसाही वाया जाईल असे त्यांचे मत होते. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथराव शिंदे, व बांधकाम आरोग्य सभापती प्रकाशराव देशमुख, यांच्याकडे सातत्याने पाठपुरवठा करून ही इमारत मंजूर करून घेतली आहे. आधुनिक पद्धतीने ही इमारत होणार असून जी प्लस वन अशी दोन मजली इमारत आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कॉटर्स सुद्धा बांधले जाणार आहेत. इमारतीला दुरुस्तीला निधी द्यावा अशी अपेक्षा गावकर्यांची होती पण राहुल केंद्रे यांनी गावकऱ्यांच्या अपेक्षेच्या पुढे जाऊन नवीन इमारत मंजूर केल्यामुळे सर्व गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.