लोहगड किल्ल्यावर ३ नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन

पुणे : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर ३ नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी व मनामनात दुर्गप्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून रा. स्व. संघाचे नानासाहेब जाधव, संदीप जाधव, प्रकाशराव मिठभाकरे, विनोद मेहता, रायगड मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, आ. बाळा भेगडे, आ. कृष्णराव भेगडे, खा. श्रीरंग बारणे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे.

यावेळी सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सरदार घराण्यातील श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे, सरदार दादा पासलकर, सरदार रघूजीराजे आंग्रे, सरदार पांडुरंग बलकवडे यांना सन्मानित करण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजता दीपोत्सवाला सुरुवात होईल. लोहगडगाव, शिवस्मारक व किल्ल्यावर भव्य दीपोत्सव करण्यात येणार आहे

You might also like
Comments
Loading...