लोहा नगरपालिका भाजपकडे, अशोक चव्हाण यांना धक्का

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची समजली जणारी नांदेडची लोहा नगर परिषद भाजपच्या खात्यात आली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही नगरपालिका जिंकली आहे. यामुळे हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हानांना मोठा धक्का आहे. अस म्हणता येईल.

लोहा नगर परिषदेच्या 17 जागांपैकी 13 जागा भाजपने जिंकल्या आहेत तर कॉंग्रेसला फक्त फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. अध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार सोनू संगेवार हे पराभूत झाले आहेत. हा निकाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्का म्हणता येईल.

कोल्हापूरचा महापौर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच, चंद्रकांत पाटलांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी