लॉकडाऊनचा परिणाम, यंदा प्रथमच ऑनलाइन ‘अरंगेतरम्’

औरंगाबाद : व्ही. सौम्याश्री यांची शिष्या मनाली सुधळकर हिचे अरंगेत्रम शनिवारी (दि.२३) जानेवारी रोजी तापडीया रंगमंदिरात सादर होणार आहे. विशेष म्हणजे कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नृत्यरसिकांसाठी हे अरंगेत्रम ऑनलाईनदेखील सादर होणार आहे. मराठवाड्यात असा प्रयत्न प्रथमच होत आहे.नृत्यशैलीमध्ये किमान सात वर्षे गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर नृत्यशैलीच्या सर्वासक्षम सादरीकरणाला अरंगेत्रम म्हटले जाते. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.

मनाली सुधळकर यांनी सांगितले, ‘माझ्यासाठी हा दिवस खुप जवळ आला आहे. २०१४ पासून मी व्ही. सौम्याश्री पवार आणि राजलक्ष्मी सेठ यांच्याकडे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड होती, ही आवड हळुहळु साधनेत बदलली आणि भविष्यात भरतनाट्यमचा प्रसार तरुण पिढीत व्हावा आणि त्यांनीही या कलेला उदनिर्वाहाचे साधन बनवण्याचा प्राधान्याने विचार करावा असे मनाली यावेळी म्हणाली. तापडीया रंगमंदिरात २३ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईच्या नालंदा नृत्य नाट्य महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि प्रसिध्द नृत्यांगणा डॉ. उमा रेले यांच्या हस्ते होईल.

प्रथमच ऑनलाइन प्रसारण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नृत्यप्रेमींना अरंगेत्रम मध्ये सहभागी होता यावे, यासाठी या कार्यक्रमाचे युटूबवर थेट प्रसारण करण्यात येत आहे. मराठवाड्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच थेट प्रसारण होणार असून नृत्यप्रेमींनी https://www.youtube.com/user/devmudra2007 या लिंकवर जाऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे शर्मिला सुधळकर यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या