#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय

पुणे : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीननंतर इटलीमध्ये कोरोनानाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच युरोपात कोरोनाने बऱ्यापैकी हातपाय पसरवले आहेत. तर भारतातही हळूहळू कोरोनांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना वायरस देशात आणि जगात सक्रीय होत असल्याचं दिसत आहे.

कोरोनाची अशी भयंकर परिस्थिती असल्याने अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गर्दीच्या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. यावर WHOच्या (जागतिक आरोग्य संघटना)  माईक रायन यांनी वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर काबू मिळवण्यासाठी केवळ लॉक डाऊन पुरेस नसल्याचं म्हंटल आहे. त्यासाठी याक्षणी आजारी असणाऱ्या लोकांना शोधण्याची व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज आहे. असे केल्यास कोरोनाला रोखता येईल.

Loading...

माईक रायन यांच्या मते, लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील आणि परिस्थिती पुन्हा धोक्याची होईल.

दरम्यान आता प्रत्येक देशानी खबरदारी म्हणून अनेक शहरांमध्ये संचारबंदी आणि कडक बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिक घरात बसून वाढत्या संसर्गाला अटकाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कितीदिवस असे घरात नागरिकांना डांबून ठेवण्यात येईल केव्हातरी नागरिक रस्त्यावर उतरतील आणि त्यावेळी मोठी गर्दी होईल. या वाढलेल्या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोन बळावण्याची शक्यता आहे, असा धोका माईक रायन यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केला आहे.

माईक रायन यांच्या मते, चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया लॉक डाऊनवर गेले तेव्हा कोरोना विषाणूचा धोका असलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांनी चौकशी केली. आता युरोप, अमेरिका, भारत आणि इतर देशांनी समान मॉडेल लागू केले पाहिजे. जर त्याचा प्रसार होण्यापासून रोखला गेला तर रोगाचा सामना केला जाऊ शकतो.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात