महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढला,या गोष्टीवर असणार निर्बंध

blank

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात करण्यात आलेला लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र हा लॉकडाऊन जरी वाढवण्यात आला असला तरी सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्याच वेळेस त्यांनी परत एकदा लॉकडाऊन वाढवणार असल्याचे संकेत दिले होते.

या काळात मास्क घालून तोंड झाकणे अनिवार्य असणार आहे. दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध असणार आहे.

सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक असेल. दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे.लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नकोत, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी चालणार नाही.

आमदार महेश लांडगे यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर दिली ‘ही’ लक्ष्यवेधी प्रतिक्रिया

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध असणार आहे. शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे असे सांगण्यात आले आहे.कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य असणार आहे.दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाज्यांसारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्या लागणार आहेत.